Month: December 2025

Read More Read more about काल दिनांक ०४/१२/२०२५ रोजी १८:१७ वाजताच्या सुमारास बॉम्बे धाब्या जवळ, रेतीबंदर खाडी रेतीबंदर, ठाणे या ठिकाणी रेतीबंदर ब्रिजवरून श्री. मोहीन अन्सारी या व्यक्तीने खाडीमध्ये उडी मारली होती. सदर घटनास्थळी आज दिनांक ०५/१२/२०२५ रोजी ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, ठाणे अग्निशमन दलाचे जवान, भिवंडी अग्निशमन दलाचे जवान व स्थानिक मच्छीमार यांच्या मार्फत ०१-बोटच्या मदतीने सुमारे ०७-तास शोधकार्य करण्यात आले. भरतीची वेळ असून, खाडी मधील पाण्याचा प्रवाह वाढत असल्यामुळे पोलीस कर्मचारी यांच्या आदेशावरून रेतीबंदर खाडीतील शोधकार्य तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहे.