
अंबरनाथ: अंबरनाथसह उल्हासनगर आणि बदलापूर शहरातील संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येत्या वर्षभरात पूर्ण क्षमतेने सुरु होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अंबरनाथ आणि बदलापूर शहराच्या सीमेवरील वालिवली परिसरात स्पेनच्या धर्तीवर आधारित असा आहे. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांतून १४८.६८ कोटी रुपयांच्या निधीतून हा प्रकल्प उभारण्याचे काम सुरु आहे. या प्रकल्पाच्या कामाची माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी आज मंगळवारी पाहणी करून आढावा घेतला.